एस. ई. ओ (SEO) म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, आपण गुगलवर (Google) आपल्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण गूगलवर सर्च करतो म्हणजेच माहिती मिळवतो. प्रत्येकालाच आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपला जास्तीत जास्त सेल व्हावा असं वाटत असते. परंतु आपण सर्च केल्यावर आपल्याला खूप लिंक्स दिसतात आणि आपण पहिल्या पेजवर असणाऱ्याच लिंक्स ओपन करून पाहतो. पण आपल्याला हा प्रश्न कधीच नाही पडत कि हेच लिंक्स का पहिल्या पेजवर आहेत बाकीचा दुसऱ्या पेजवर का आहेत??? ह्याचा खरं कारण आहे सी .ई.ओ. याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला वरच्या रँकवर आणू शकतो.
एस.इ.ओ (SEO) चे दोन प्रकार आहेत
-
ऑन पेज एस.इ.ओ (On Page SEO)
-
ऑफ पेज एस.इ.ओ (Off Page SEO)
ऑनपेज सी.ई.ओ म्हणजे काय ?
ऑन-पेज एसइओला “ऑन-साइट” एस.इ.ओ म्हणूनही ओळखले जाते
आपण आपल्या वेबसाईटला सर्वोत्तम रँकिंग मिळावं म्हणून आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्या वेबसाईट वर किंवा वेब पेज वर परफॉर्म करतो त्याला ऑन पेज एस.इ.ओ म्हणतात
यामध्ये पुढील व्यवस्थापनाचा समावेश आहे:
पृष्ठ शीर्षके
प्रत्येक पेज आणि पोस्ट ला अद्वितीय (unique) शीर्षक असावं आणि त्यामध्ये मुख्य कीवर्डचा उल्लेख केलेला असावा.
मेटा टॅग
वेबसाईटच्या प्रत्येक पेजवर शीर्षक व वर्णन (description) असावं यामुळे गुगलच्या क्रॉलर्सला त्या पेजचा हेतू समजण्यास मदत होईल.
हेडिंग टॅग्स
हेडिंग्स मध्ये H1 पासून H6 पर्यंत हेडिंग टॅग्स उपलब्ध आहेत. ह्या टॅग्सचा उपयोग माहिती लिहिण्यासाठी होतो. आणि आपल्याला वेगळे वेगळे सेक्शन ओळखण्यासहि मदत होते.
URL संरचना
जेहवा पण Google Bot आपल्या वेबसाईट वर येतात ठेवा ते सगळ्यात पहिले आपले URL (वेबसाईट चा पत्ता) बघतात. म्हणून कधीही आपला Focus keyword हा आपल्या URL मध्ये असावी याची नोंद घ्यावी.
अंतर्गत दुवा साधणे
इतर वेबसाइटशी लिंक करणे पुरेसे नाही,एका पेज वरून दुसऱ्या पेज वर जाण्यासाठी इंटर्नल लिंकिंग आवश्यक आहे आणि सर्च इंजिनला हि त्याचा फायदा होतो.
इमेज
वेबसाईट मध्ये फक्त माहिती असून चालत नाही तर त्यात इमेजेस असतील तर वाचक मन लावून समोर असलेली माहिती वाचतो. वेबसाईट मध्ये माहिती सोबत इमेजेसहि जोडणे हा सर्वोत्तम सराव आहे. इमेज ची साईझ जेव्हडी कमी ठेवता येईल तेव्हडी कमी ठेवावी
पेज स्पीड
आपल्या वेबसाईट चा स्पीड जास्त असल्यावर त्याचा एस.इ.ओ साठी आणि वाचकांना त्याचा फायदा झाल्यास आपली वेबसाईट Google च्या पहिल्या पेज वर यायला मदत होते.
ऑफ पेज एस.इ.ओ म्हणजे काय ?
ऑफ-पेज एस.इ.ओ ला “ऑफ -साइट” एस.इ.ओ म्हणूनही ओळखले जाते.
ऑफ पेज एस.इ.ओ मध्ये Google ला आपण सांगतो इतरांना आपल्या साइटबद्दल काय वाटते.
यामध्ये पुढील व्यवस्थापनाचा समावेश आहे:
लिंक्स सबमिशन
जर आपल्याला आपल्या वेबसाईट सर्वोत्तम स्थानावर आणायचे असेल तर आपल्या वेबसाईट मध्ये आपल्याला लिंक्स add कराव्या लागतात ज्या आपल्या वेबसाईटकडे पॉईंट करतील आणि त्या Google ला सबमिट कराव्या लागतात. म्हणून लिंक्स बिल्डिंग हे ऑफ पेज एसइओ मध्ये सर्वात आवाहनात्मक आणि महत्वाचे काम आहे.
कन्टेन्ट एक्सचेन्ज
कन्टेन्ट हा एसइओ सेव चा राजा आहे असं म्हणतात.त्यामुळे आपले कन्टेन्ट हे स्वतः लिहिलेले पाहिजे.कॉपी केलेल्या कन्टेन्टमुळे आपण आपल्या वेबसाईटला प्राथमिक रँकिंग नाही देऊ शकत.कन्टेन्ट जेवढे ओरिजिनल आणि शरेबल असणार तेवढा आपल्याला आपल्या वेबसाईट मध्ये बॅकलिंक्स मिळतात आणि एसइओ मध्ये त्याचा फायदा होतो.
ब्लॉग डिरेक्टरी सबमिशन
डिरेक्टरी सबमिशन नेहमी उत्कृष्ट बॅकलिंक्स बनवण्याचा काम करत असतो.ह्या कामासाठी जास्त वेळ लागतो पण ह्याचा रिझल्ट दीर्घ काळ असतो. म्हणून योग्य डिरेक्टरी निवडणे महत्वाचे असते.
आर्टिकल सबमिशन
आपले आर्टिकल्स योग्य डिरेक्टरीला सबमिट करणे आवश्यक असते.परंतु त्यासाठी आपले कन्टेन्ट हे ओरिजिनल आणि unique असले पाहिजे.म्हणून योग्य कॅटेगरी आणि चांगल्या quality चे कन्टेन्ट असणे महत्वाचे असते.
Quora.com वर लेख लिहिणे
Quora वर वाचक विविध प्रश्न-उत्तरे सर्च करतात.आपण प्रश्नांची उत्तरे लिहून आपल्या वेबसाईट ची लिंक त्यात टाकू शकतो. Quora वरआपण आपल्या वेबसाईट ची लिंक टाकल्याने वाचक आपली वेबसाईट चेक करतात त्यामुळे आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक मिळते आणि लिंक पण बिल्ड होते.
तुम्ही मुंबई किव्हा नवी मुंबई मध्ये उत्तम एस. ई. ओ एक्स्पर्टचा ( SEO Expert in Mumbai & Navi Mumbai ) शोधात आहात का??
तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात. आम्ही तुमची वेबसाईट योग्य ऑन पेज व ऑफ पेज techniques चा उपयोग करून विविध सर्च इंजिन्स जसे कि Google, Yahoo, Bing यांवर उच्च स्थानावर आणण्यास मदत करू.
मोफत मार्गदर्शनासाठी आमच्या सल्लागाराच्या संपर्कात राहा ( Best SEO Expert in Mumbai, Maharashtra ).