सध्याच्या काळात वेबसाईट बनवणे अत्यंत सहज आणि सोपे झाले आहे ते हि कमी दरात . तुमचे ऑनलाईन स्टोरच्या
कामाचा वेळ हा मर्यादित नसतो आणि हा एक मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच
मदत करेल. वेबसाईट असणे म्हणजे केवळ तुम्ही तुमच्या ग्राहकांना योग्य ते मूल्य विकणे असे नाही तर ग्राहकांना हि महत्व देणे
आहे. तुमच्या व्यवसायाला वेबसाईट का असावी याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
Want to read this article in English? Visit Why you should have a Business Website?
सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे.
जेव्हा तुमच्या व्यवसाय एकाद्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन येतो तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू
शकता व फक्त नॅशनल मार्केट मध्ये नाही तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.वेबसाईटद्वारे आपल्याला
लोकांपर्यंत जाण्याची गरज नाही ग्राहक आपल्यापर्यंत आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पोहोचतात.आपल्या
वेबसाईट मध्ये एस.ई.ओ. आणि वेबसाईट ऍनालीटीक्स जोडली तर ते आपल्याला वेबसाईट अनुकूल
बनवण्यासाठी मदत करतात.
वाढलेली विक्री आणि सेवा.
जेवढी ऑनलाईन विक्री जास्त होईल तेवढ आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते.यामुळे
आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन महत्व देखील वाढते.अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे,विविध सोशिअल
मीडियावर जाहिरात टाकणे यांमुळे जास्तीत जास्त विक्री होण्यास नक्कीच मदत होते.
डेटा आणि प्रोडक्टसचे व्यवस्थापन.
ऑनलाईन व्यवसाय करत असताना जो डेटा तयार होतो त्याचा व्यावस्थापनेसाठी कोणत्याही मनुष्यबळाची
आवशकता नाही.सगळे व्यवहार हे ऑनलाईन इंटरनेटद्वारे आणि बॅकेन्ड डाटाबेसद्वारे होतात.सगळ्या व्यवहाराचे
डिटेल्स हे थेट डाटाबेस मध्ये जातात.त्यामुळे आपल्या देवाण घेवाणाची नोंद ठेवण्यासाठी कोणत्याही एक्सटर्नल
डाटाबेस किंवा कोणत्याही एक्सटर्नल इंटरव्हेंशन्स गरज नसते.
सुखावह / सोयीस्कर खरेदी.
व्यवसायाचा मालक ऑनलाईन असतो तेव्हा तो वस्तूंची खरेदी आणि ऑर्डर्स इंटरनेटच्या साहाय्याने मॅणेजे
करतो.त्यासाठी कोणत्याही हस्त संपर्काची गरज नसते.सर्व संवाद किंवा संपर्क मुख्यतः ई-मेल आणि दूरध्वनी
यांमार्फत होतात.
व्यवसायाचा मालक थेट विक्रेत्यांशी संपर्क साधून व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तूंची ऑनलाईन सोय करू
शकतात.त्यामुळे खरेदीप्रक्रिया सोपी , जलद आणि साधी होते.
सोयीस्कर विक्री.
ग्राहक आपल्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन वस्तू आणि सेवेची ऑर्डर करतात.ऑर्डर योग्य ट्रॅक मध्ये ठेवणे आणि तिचे
योग्य व्यवस्थापन कारणे ह्या गोष्टी ऑनलाईन होतात.म्हणून जास्त वस्तूंची विक्री करताना ऑनलाईन पद्धत
सोयीस्कर आणि सुरक्षित केली पाहिजे.जेव्हा एका पेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करायची असेल तेव्हा ऑनलाईन पद्धत
जास्त सोयीस्कर आणि सोपी असते.
कोणत्याही यादीची गरज नसते.
ऑनलाईन व्यवसाय वेबसाईटमध्ये जेव्हा ग्राहक एखाद्या वस्तूची मागणी करतो तेव्हाच त्याला ती वस्तू उपलब्ध
होते.ऑनलाईन मार्केटिंगच्या ठिकाणी कोणत्याही वस्तूंचा साठा नसतो.ते तेव्हाच उपलब्ध होतात जेव्हा त्यांची गरज
असते.त्यामुळे कोणतीही यादी जतनकरण्याची गरज नसते.आणि आपला पैसे कुठल्याही अनावश्यक गुंतवणुकीपासून
जतन केला जाऊ शकतो.
कमीत कमी अर्थव्यवस्थेचा वापर.
ऑनलाईन वेबसाईट व्हावी ह्यासाठी प्रत्येक्ष पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत फार कमी खर्च येतो.ऑनलाईन वेबसाईट
साठी जास्त जागा आणि वेळेची गरज नसते.एकदा का तुमची वेबसाईट तयार झाली कि तुम्ही शुभस्थ शिघ्रम
बोलायला मोकळे झालेले असता.
कमी मेन्टेनन्स खर्च.
ऑनलाईन वेबसाईट ला देखभाल खर्च आणि व्यवस्थापन खर्च कमी लागतो.फक्त त्रुटी आणि अडथळे यांची
व्यवस्थापन कारणे आवश्यक असते.वेबसाईट वीकली किंवा मंथली अपडेट्स करावी लागते त्यामुळे खर्च कमी
होतो.दुसऱ्या बाजूला वेबसाईट बनवलेला व्यक्तीच आपल्या वेबसाईटची देखभाल करत असतो.
कमी मनुष्यबळ.
वेबसाईट तयार करण्यासाठी आणि तिची देखभाल करण्यासाठी केवळ तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता
असते.वेबसाईट ऑनलाईन आल्या नंतर आपल्याला एस.ई.ओ. आणि ऍनालीटीक्स ह्याची गरज असते त्यासाठी
लागणारे मनुष्यबळही कमी असते.जेव्हा तुम्ही ऑफलाईन व्यवसाय सुरु कराल तेव्हा त्यासाठी कामगार,सुरक्षा
अधिकारी,रेसेपशनिस्टची नियुक्तता करावी लागते.त्यासाठी खर्चहि अति प्रमाणात येतो.म्हणून जेव्हा तुमच्याकडे
पैसा आणि वेळ कमी असेल तेव्हा तुमच्यासाठी ऑनलाईन व्यवसाय हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल.
ग्राहकांशी एकाच वेळेस संवाद.
जर तुमच्या ऑफलाईन व्यवसाय असेल तर तुम्हाला अनेक ग्राहकांशी सवांद साधावा लागतो.तेव्हा ग्राहकांशी संवाद
साधण्यासाठी,ग्राहकांची ऑर्डर घेण्यासाठी,त्या ऑर्डरचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला अनेक कर्मचाऱ्यांची गरज
असते.याउलट ऑनलाईन व्यवसाय तुम्हाला गडबड आणि वितर्क टाळण्यासाठी मदत करेल.ऑनलाईन व्यवसायामध्ये
संवाद फक्त ग्राहक आणि ग्राहकांदरम्यान असलेल्या ऑनलाईन वेबसाईट पोर्टल इंटरफेस यांमध्ये असतो.ग्राहक आणि
मालक यांच्यामधील संवाद देखील अभिप्राय पद्धतीने होतो.
तर आता तुम्हाला समजलेच असेल व्यवसायासाठी वेबसाईटची आवश्यकता का आहे.
पण तुम्हाला माहित नसेल सुरुवात कशी करावी तर आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत.तर मग आताच
आमच्याशी संपर्क साधा.