सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ?
एस. ई. ओ (SEO) म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, आपण गुगलवर (Google) आपल्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण गूगलवर सर्च करतो म्हणजेच माहिती मिळवतो. प्रत्येकालाच आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपला जास्तीत जास्त सेल व्हावा असं वाटत असते. परंतु आपण सर्च केल्यावर आपल्याला खूप लिंक्स दिसतात आणि आपण पहिल्या पेजवर असणाऱ्याच लिंक्स ओपन करून पाहतो. पण आपल्याला हा प्रश्न कधीच नाही पडत कि हेच लिंक्स का पहिल्या पेजवर आहेत बाकीचा दुसऱ्या पेजवर का आहेत???